Ad will apear here
Next
‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ विषयावर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान
डॉ. श्रुती पानसेपुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवारी, २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. 

‘तासनतास मोबाइल हातात धरून गेम खेळणाऱ्या टीनएजर्सच्या मेंदूत नक्की काय घडतंय? मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ नावाचा भाग काय विचार करतो? गेम खेळण्याच्या आणि सोशल मीडियाच्या लालसेतून मोबाइल-इंटरनेट व्यसन होते का? आणि व्यसनी माणसाच्या मेंदूतला ‘ग्रे मॅटर’ संकुचित होतो का? त्याचा व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो? अशा अनेक प्रश्नांचा वेध डॉ. श्रुती पानसे आपल्या व्याख्यानात घेणार आहेत. तेव्हा अधिकाधिक विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा,’असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी 
‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर  डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान 
स्थळ : इंडियन एज्युकेशन संस्थेचे सभागृह, मयूर कॉलनी.
दिवस व वेळ : गुरुवार, २८ मार्च २०१९, सायं. ६.१५ वाजता 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZLRBY
Similar Posts
‘बौद्धिक संपदा व पेटंट’ विषयावर प्रा. हिंगमिरे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘नवीन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’ या विषयावर प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मुलांच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या टाकू नयेत’ पुणे : ‘विविध वयोगटानुसार शरीरासोबत बुद्धीचीदेखील वाढ होते. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेविरुद्ध त्यांच्यावर निर्णय लादू नयेत. त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे,’ असे मत बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केले.
‘बौद्धिक संपदेबाबत भारतीयांनी सजग राहायला हवे’ पुणे : ‘भारतीय लोकांची बुद्धिमत्ता पाहता आपल्याकडे सर्वाधिक पेटंट असायला हवेत; परंतु जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी पेटंट आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे राहावे, यासाठी पेटंट किंवा स्वामित्व हक्क असणे गरजेचे असते. त्यामुळे भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा,
‘मोबाइलच्या अतिवापराने विविध आजारांना निमंत्रण’ पुणे : ‘मोबाइलच्या अतिवापरामुळे, तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. अनेक संस्था व डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार उद्भवतात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language